विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता मास्टर्सविनाही करता येणार पीएचडी, पण कसे?

UGC PhD Rules: नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीमुळे, पीएचडीचे स्वप्न पाहणाऱ्या पदवीधरांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी काळजी करण्याची गरज नाही. पीएचडीसंदर्भातील महत्त्वाची माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देण्यात आली आहे.

४ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्याला थेट पीएचडी करता येणार आहे. यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी बुधवारी सांगितले की, चार वर्षांची बॅचलर पदवी असलेले विद्यार्थी आता थेट पीएचडी करू शकतील. यूजीसीच्या अध्यक्षांनी म्हटले आहे की, 4 वर्षांचा कार्यक्रम पूर्णपणे लागू होईपर्यंत तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम बंद केला जाणार नाही. UGC दीर्घकाळापासून पदवीपूर्व कार्यक्रमांसाठी नवीन अभ्यासक्रम आणि क्रेडिट फ्रेमवर्क तयार करण्यात गुंतले होते.

UGC FYUP जारी झाले
UGC ने जारी केलेला नवीन अभ्यासक्रम NEP 2020 वर आधारित आहे. याअंतर्गत नियमांमध्ये लवचिकता येणार असून विद्यार्थ्यांनाही पूर्वीपेक्षा अधिक सुविधा मिळणार आहेत. ज्याअंतर्गत आता चार वर्षांचा पदवीपूर्व शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना पीएचडी करता येणार आहे. त्यांना पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्याची गरज नाही. शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीमुळे आता पीएचडीचे स्वप्न पाहणाऱ्या पदवीधरांना पदव्युत्तर अभ्यासक्रम करण्याची चिंता करावी लागणार नाही. चार वर्षांची पदवी उत्तीर्ण करणारा कोणताही विद्यार्थी थेट पीएचडीसाठी पात्र असेल.

4 वर्षांच्या ग्रॅज्युएशनचे फायदे
देशातील सर्व 45 केंद्रीय विद्यापीठांमध्ये पुढील सत्रापासून 4 वर्षांचे पदवीपूर्व अभ्यासक्रम लागू करण्यात आले आहेत. सर्व केंद्रीय विद्यापीठांसह बहुतेक राज्यस्तरीय आणि खाजगी विद्यापीठे देखील 4 वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम देतात. याशिवाय देशभरातील अनेक डीम्ड युनिव्हर्सिटी देखील हा 4 वर्षांचा पदवीपूर्व कार्यक्रम राबविण्यास संमती देत ​​आहेत.

नवीन आराखड्यानुसार, आता विद्यार्थी अभ्यासक्रमादरम्यान त्यांना हवे असल्यास ब्रेक घेऊ शकतात. विद्यार्थी 7 वर्षात पदवी अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात. यादरम्यान त्याला 8 सेमिस्टरचा अभ्यास करावा लागणार आहे. तुम्ही अंतिम सेमिस्टरमध्ये संशोधनासाठी विषय निवडू शकता. तर, पदवीचे 4 वर्षे पूर्ण झाल्यावर, UG ऑनर्स पदवी प्रदान केली जाईल.