अभाविप कडून विद्यापीठात सुरक्षाविषयक मोर्चा..!

Pune University: दिनांक १ नोव्हेंबर २०२३ या दिवशी विद्यापीठामध्ये एस. एफ. आय. (स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया) या डाव्या विचारांच्या संघटनेची मेंबरशिप सदस्यता सुरू होती. यावेळी सामान्य विद्यार्थ्यांकडून जबरदस्तीने सदस्यता करून घेतल्या जात होती. सामान्य विद्यार्थ्यांनी सदस्येला नकार दिल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेमध्ये तीन ते चार विद्यार्थी जबर जखमी झाले असून एका विद्यार्थ्याला डोक्यावर मोठी जखम झाली आहे.

प्रसिद्धी पत्रकानुसार, या सर्व घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये (Savitribai Phule Pune University) १ नोव्हेंबरला सायंकाळी ४ वाजता सुरक्षा विषयाला घेऊन मोर्चा काढला. शेकडो विद्यार्थ्यांचा हा मोर्चा विद्यापीठातील जुन्या अनिकेत कॅन्टीन पासून सुरू होऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्या जवळील उद्यानामध्ये पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांनी सुरक्षेला घेऊन प्रश्न उपस्थित केले.

अभाविप विद्यापीठ अध्यक्ष शिवा बारोळे म्हणाले की, “ज्या विद्यार्थी संघटना विद्यापीठातील मोफत खिचडी वाटपाला विरोध करतात त्याच संघटना खिचडी वाटपाच्या इथे येऊन विद्यार्थ्यांवर गुंडगिरी करून त्यांची सदस्यता करून घेतात. आणि विद्यार्थ्यांना मारहाण करतात ही घटना अत्यंत दुःखद आहे.”

अभाविप पुणे महानगर मंत्री हर्षवर्धन हरपुडे म्हणाले की, “तर संपूर्ण देशभरामध्ये डाव्या विचारांच्या संघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हुतात्मा भगतसिंग यांच्या नावावर विद्यार्थ्यांना भडकवून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधून घेतात, त्याचबरोबर सामान्य विद्यार्थ्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करतात. या घटनेचा अभाविप तीव्र शब्दात निषेध करते व अशा प्रकारच्या घटनांच्या विरोधात आम्ही कायम उभे राहू.”

महत्त्वाच्या बातम्या-

जावई केएल राहुल नव्हे तर सुनील शेट्टीला आवडतो ‘हा’ खेळाडू, पाहा कोण आहे तो?

अभिनेता रजनीकांत यांचा डाय हार्ड फॅन, उभारलं भव्यदिव्य मंदिर; होतेय सर्वत्र चर्चा

भाजप आमदाराची पत्नी बेपत्ता, शोधासाठी पोलिसांची 6 पथके रवाना