‘सुपरस्टार असलो तर काय झालं महागाईचा फटका आम्हालाही बसतो’, टोमॅटो दरवाढीवरुन सुनील शेट्टी चिंतेत

Suniel Shetty Tomato Price Hike: गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर (Tomato Price Hike) गगनाला भिडले आहेत. काही ठिकाणी तर टोमॅटोचा भाव 100 रुपये किलोच्या पुढे गेला आहे. टोमॅटो दरवाढीचा फटका फक्त सामान्यांच्या खिशाला नव्हे तर अगदी कलाकारांनाही बसला आहे.

सुनील शेट्टी यांनी टोमॅटोच्या दराबाबत आता वक्तव्य केले आहे. सुनील शेट्टी (Suniel Shetty) म्हणाला की, ‘माझी बायको घरी फक्त दोन दिवस पुरेल इतकाच भाजीपाला आणते. ताज्या भाज्या खाण्यावरच आम्ही भर देतो. मात्र, आजकाल टोमॅटोच्या किमती वाढत आहेत, त्याचा परिणाम आपल्या घराच्या स्वयंपाकघरावरही होत आहे. आजकाल मी टोमॅटो कमी खायला सुरुवात केली आहे. असं होऊ शकतं की, लोकांना वाटेल की, तो सुपरस्टार आहे त्यामुळे महागाईचा त्याच्यावर काय परिणाम होईल. पण तसं काही नाही. आम्ही देखील या सगळ्या गोष्टींमधून जातो.’