एक व्यक्ती पक्षाच्या बाहेर गेली म्हणजे काही पूर्ण पक्ष डिस्टर्ब होत नाही – वडेट्टीवार

Vijay vadettiwar On Ashok Chavan Resignation: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपच्या पराभवाची स्वप्ने पाहणाऱ्या कॉंग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. हा धक्का केवळ कॉंग्रेसला नव्हे तर महाविकास आघाडीलादेखील धक्का मानला जात आहे. अशोक चव्हाण हे आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर (Amar Rajurkar) हे भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यामुळेपक्षाची गळती थांबविण्याचे मोठे आव्हान आता कॉंग्रेस समोर असणार आहे.

आधी मिलिंद देवरा नंतर बाबा सिद्दीकी आणि आता अशोक चव्हाण यांसारेख पक्षातील दिग्गज नेते एकामागोमाग पक्षातून बाहेर पडल्याने काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. काल अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर मोठा राजकीय भूकंप झाला. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याची हायकमांडसोबत चर्चाही झाली. डॅमेज कंट्रोल करण्याकरीता कालपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे आमदारांशी संपर्क साधत आहेत.

दरम्यान, एका बाजूला हे सुरु असताना दुसऱ्या बाजूला अशोक चव्हाण यांच्यावर विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. राजकारणात पक्षात बदल होत असतात, लोकं येत असतात, तसे जातातही. एक व्यक्ती पक्षाच्या बाहेर गेली म्हणजे काही पूर्ण पक्ष डिस्टर्ब होत नाही. या परिस्थितीमधून काँग्रेस पुन्हा उभारी घेईल आणि पक्ष मजबुतीन उभा राहील असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

मी कायम काँग्रेससोबतच आहे. पक्षाने मला खूप काही दिलं. मी काँग्रेससोबत होतो, काँग्रेससोबत आहे आणि काँग्रेससोबतच राहणार असेही वडेट्टीवर यांनी स्पष्ट केलं.पक्षाने मला भरभरू दिलं, मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहूनच विचारधारेसोबत काम करणार असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-

अशोक चव्हाणांनी राजीनामा देताच Ramdas Athawale यांची मोठी ऑफर; म्हणाले, रिपल्बिकन पक्षात…

“काँग्रेस लोकशाही वाचवण्याची लढाई लढत असताना, सगळं काही दिलेले नेते..”, नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

“कोणाबद्दल मी तक्रार करणार…”, आमदारकीच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया