Umesh Patil | मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन तात्काळ हकालपट्टी करावी

Umesh Patil | मुख्यमंत्र्यांना सांगून सुद्धा शिवतारे यांचे शेपूट सरळ झाले नाही त्यामुळे त्यांचे शेपूट छाटण्याची वेळ आली असून मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी केली आहे.

गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन उमेश पाटील यांनी शिवसेना नेते विजय शिवतारे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. आज पुन्हा एकदा विजय शिवतारे यांनी मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांच्यावर टिका केल्यानंतर उमेश पाटील यांनी त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.

विजय शिवतारे यांचे व्यक्तीगत आयुष्य आणि बाबी इतक्या खालच्यास्तराच्या आहेत आणि त्या चव्हाटयावर आल्यामुळे विजय शिवतारे यांचे व्यक्तिमत्त्व काय लायकीचे आहे हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसमोर आले. त्यामुळे त्यांना इतरांची लायकी तपासण्याचा अधिकार नाही असा जोरदार प्रतिहल्ला उमेश पाटील यांनी केला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार जाहीर, पुण्यात धंगेकर तर कोल्हापूरातून या नावाला पसंती

LokSabha Election 2024 | ‘अजितदादा जे बोलले ते पवारसाहेबांचा अभिमान टिकवण्यासाठी आणि आघाडीचा धर्म पाळण्यासाठी होते’

Jitendra Awad | माझ्या डोळ्यात साहेबांसंदर्भात आदर आणि प्रेम असल्याने मनातून अश्रू येतात