ग्रामपंचायत निवडणूकीत जनतेने अजितदादा यांनी घेतलेल्या निर्णयाला ही सलामी दिली आहे – सुनिल तटकरे

Sunil Tatkare – अजितदादांच्या (AJit Pawar) नेतृत्वाखाली राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये साडेपाचशे पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर झेंडा फडकला आहे माझ्या मते जनतेने अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाला ही सलामी दिली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल मत व्यक्त केले.

घड्याळ तेच वेळ नवी, निर्धार नवपर्वाचा या अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील शेवटचा दिवस असून वर्धा येथे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.

पक्ष संघटनेची बांधणी करावी आणि अजितदादांनी घेतलेल्या निर्णयाची कारणमीमांसा सांगणे, देशात व राज्यात एकविचाराचे सरकार असावे हे सांगण्यासाठी ‘घड्याळ तेच वेळ नवी,’ निर्धार नवपर्वाचा’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. अस्थिरता निर्माण होते तेव्हा भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र येतात. मात्र आम्ही काहीतरी वेगळे केले आहे हे भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे म्हणून हे अभियान सुरू केले असल्याचे सुनिल तटकरे म्हणाले.

यंत्रणांच्या भीतीने आम्ही भाजपसोबत गेलो असा जाणीवपूर्वक आभास निर्माण केला गेला तो निखालस खोटा आहे. २०१४ मध्ये भाजपने पाठिंबा मागितला नव्हता परंतु तरीही आम्ही पाठिंबा जाहीर केला होता.
ज्या कॉंग्रेसने बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला नेहमी विरोध केला त्याच ठाकरेंच्या शिवसेनेला कॉंग्रेसने सत्तेत पाठिंबा दिला होता हेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

गुवाहाटीला एकनाथ शिंदे गेल्यावर सत्तेत अस्थिरता निर्माण झाल्याने आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांनी पवारसाहेबांना पत्र लिहून भाजपसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्या पत्रावर सर्वांच्या सहया आहेत. मात्र तो निर्णय झाला नाही असेही सुनिल तटकरे म्हणाले.

राज्यात नवीन कार्यकर्त्यांची फळी अजितदादांच्या व प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली तयार होताना दिसत आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

ब्रिटिशांना ‘चले जाव’ चा नारा देणार्‍या महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सेवाग्राम आश्रमाला आज भेट दिली. यावेळी त्या काळात महात्मा गांधीजी कसे रहात होते आणि स्वातंत्र काळात चळवळी इथून कशा घडल्या याची माहिती घेतल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर,माजी मंत्री सुबोध मोहिते, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

दिवाळीत प्रदूषण करणारे फटाके टाळावेत; विद्याताई चव्हाण यांचे नागरिकांना आवाहन

बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी धडा शिकवला..

‘सरकारने मराठा आरक्षणावर एकमत केलं पाहिजे; मुख्यमंत्री एक बोलतात, उपमुख्यमंत्री दुसरं बोलतात’