Sunil Tingre | मोहोळ यांना अधिक मताधिक्य देणे ही माझ्यासह सर्वांची जबाबदारी

Sunil Tingre |  वडगाव शेरी आणि नगर रोड परिसरातील नागरीकांसाठी भामा आसखेडमधून पाणीपुरवठा करणार, असे आम्ही ऐकत होतो. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या विषयाला चालना दिली. एक गोष्ट सांगितलीच पाहिजे की महापौर म्हणून मुरलीधर मोहोळ हेसुद्धा यासाठी किती आग्रही होते, हे मी बघितले आहे. जनहिताच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न करणारा एक चांगला उमेदवार आपल्याला त्यांच्या रूपाने मिळालेला आहे. ते निवडून येतीलच, पण आता त्यांनाजास्त मताधिक्य देणे ही माझ्यासह आपली सर्वांची जबाबदारी आहे’, असे आवाहन वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांनी वडगाव शेरीतील मेळाव्यात केले.

तसेच भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांच्या महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ म्हणाले, मी एक कार्यकर्ता आहे. आमच्यासाठी देश सर्वप्रथम, नंतर पक्ष असतो. पुण्यात विकासाला मोठा निधी मिळू शकतो आणि पुण्याचा महापौर म्हणून काम करताना विकासाची सर्वाधिक संधी ही वडगावशेरी मतदार संघात आहे. असे माझे मत आहे. त्यामुळे या परिसरात मेट्रोचे विस्तारीकरण, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्यासाठीच्या पायभूत सुविधा विकसित करण्यासाठी माझे प्राधान्य असेल. आपले यावेळचे एक बहुमोल मत हे भाजपला नाही तर आपले एक मत हे राष्ट्रासाठी द्यावयाचे आहे. त्यामुळे आपण सर्वानीच जास्तीतजास्त मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचा संकल्प आज करूयात. मेळाव्यात सर्वच मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, माजी आमदार बापूसाहेब पठारे, शिरूर पंचायत समितीचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जासुद, हवेली बाजार समितीचे माजी उपसभापती राजेद्र कंद, हवेली बाजार समितीचे संचालक नानासाहेब आबनावे, भाजपाचे तालुका अध्य़क्ष आबासाहेब सोनावणे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल पाचरणे, भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप सोनावणे, नगरसेवक राहुल भंडारे, सचिन पलांडे, रोहित खैरे, केशव पाचरणे, संतोष भरणे, सचिन सातपुते, अनिल नवले यांच्यासह श्रीगोंदा-पारनेर-हवेली तालुक्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात रहायला असलेले नागरीक, तरूण मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांना मिळणार आता देवधरांचीही साथ

मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका? नागरिकांची नाराजी शिवाजी दादांच्या पथ्यावर

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांतदादा मैदानात; मॅरेथॉन बैठकांचा लावला धडाका