हे चित्र बारामतीकरांनी पहिल्यांदाच पाहिलं, बाजूलाच उभ्या, पण Supriya Sule यांनी अजितदादांना भेटणं टाळलं

Baramati Rojgar Melava: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आज पहिल्यांदाच बारामती येथील नमो महारोजगार मेळाव्याच्या (Namo Maharojgar Melava) निमित्ताने शरद पवार (Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) एकत्र आले आहेत. या कार्यक्रमादरम्यान जरी पवार कुटुंबातील सदस्य एकत्र आले असले तरीही त्यांच्यातील नाराजी स्पष्टपणे दिसून आली.

बारामतीत सुरू असलेल्या राज्य सरकारच्या नमो रोजगार मेळाव्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर होते. एकमेकांच्या बाजूलाच उभे होते. पण दोघांनीही एकमेकांकडे पाहणं आणि भेटणं टाळलं. सुप्रिया सुळे सर्वांना भेटल्या. विचारपूस केली. पण दादांची विचारपूस केली नाही.

यावेळी सर्वांनी एकमेकांना नमस्कार केला. सुप्रिया सुळेही स्टेजवर आल्या. त्यांनी स्टेजवर आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नमस्कार केला. मुख्यमंत्र्यांच्या बाजूलाच अजितदादा होते. त्यांना बायपास करून सुप्रिया सुळे पाठून गेल्या. समोर देवेंद्र फडणवीस येताच त्यांनाही सुप्रिया सुळे यांनी नमस्कार केला. त्यांची विचारपूस केली. पण अजित पवारांकडे मात्र त्यांनी नजरही वळवली नाही. यापूर्वी पवार कुटुंबात असं कधीच घडलं नव्हतं. बारामतीकरांनी मात्र हे चित्र पहिल्यांदाच पाहिलं. त्यावेळी अनेकांना आश्चर्यही वाटलं.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी: Nana Patole

Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले

Muralidhar Mohol | मोहोळांनीही उघडले लोकसभेचे पत्ते; म्हणाले, ‘मी लोकसभेची तयारी करतोय, पण…’