Mahesh Jadhav | अमित ठाकरे यांच्यावर आरोप करणारे महेश जाधव करणार ‘या’ पक्षात प्रवेश

Mahesh Jadhav : गेल्या महिन्यात मनसे नेते पदावरुन हटवण्यात आलेले माथाडी कामगार नेते महेश जाधव आता राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार आहेत. पूर्वी मनसेत असलेल्या महेश जाधवांनी अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला होता. महेश जाधव हे राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या अजित पवार गटात जाणार आहेत.

आज वाशीच्या रघुलिला मॉल येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विश्वास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमावेळी महेश जाधव (Mahesh Jadhav) आपल्या हजारो माथाडींचे कामगारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते आहे.

मनसे नेते अमित ठाकरे यांच्याशी फोनवरून भांडण झाल्यानंतर त्यांनी आपला मनसेतील पदाचा राजीनामा दिला होता. महेश जाधव आणि अमित ठाकरे यांच्या संभाषणाची ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यानंतर कामगाराची बाजू लावून धरल्याने मला मारहाण केल्याचा आरोप जाधव यांनी मनसे नेत्यांवर केला होता. मारहाणीच्या घटनेनंतर मनसेचे दोन गट आमनेसामने येऊन त्यांच्यात जोरदार राडा झाला होता.

महत्वाच्या बातम्या

Lok Sabha Elections | भाजपचे आजपासून राष्ट्रीय अधिवेशन; लोकसभा निवडणुकीचा रोडमॅप तयार

Rooftop Solar Scheme | घराच्या छतावर सोलर पॅनेल लावायचे आहेत? बँका गृहकर्ज देऊन वित्तपुरवठा करणार आहेत

‘भाजपामुळे राज्याची संस्कृती बिघडली, चिखलफेकीसाठी टोळ्या भाड्याने…’; चिपळूणच्या राड्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया