प्रबोधनकार ठाकरेंबद्दल केलेलं ट्विट डिलीट करण्याची सुप्रिया सुळेंवर नामुष्की 

मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट केलं होतं. ते ट्विट त्यांनी आता डिलीट केलं आहे. प्रबोधनकार के. सी. ठाकरे असा या ट्विटमध्ये उल्लेख होता.

प्रबोधनकार ठाकरे यांची आज 137 वी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांनी हे ट्विट केलं होतं मात्र टीका होऊ लागताच ते ट्विट त्यांनी डिलीट केलं आहे. आता सुप्रिया सुळे यांनी दुसरं ट्वीट करून सारवासारव केली आहे.

दरम्यान, या ट्वीट नंतर त्यांच्यावर तुफानी टीका होऊ लागली होती. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील सुळे यांच्यावर शरसंधान केले होते. देशपांडे म्हणाले, प्रबोधनकार ठाकरेंना के.सी.ठाकरे म्हणण्या एव्हढ्या मोठ्या झाला नाहीत ताई असं देशपांडे म्हणाले होते.