‘पवार साहेब व कुटुंबीयांवर पाठीमागून टीका करणारे या महाराष्ट्रात दिपक केसरकर सारखे भरपूर आहेत’

मुंबई – आजपर्यंत राज्यात शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली आहे, त्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार (Sharad Pawar) यांचा हात आहे. ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा शरद पवार यांनी शिवसेना का फोडली? बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना त्यांना यातना का दिल्या, याचं उत्तर शरद पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला द्यावं, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Keskar)यांनी म्हटले.

शिवसेना फुटीमध्ये पवारांचा हात आहे. बाळासाहेबांच्या हयातीत त्यांना यातना का दिल्या, हे शरद पवार यांनी जनतेला सांगावे असे आवाहनही त्यांनी केले शरद पवार यांनी अनेकदा खासगीत बोलताना शिवसेनेच्या फुटीबाबत सांगितले असल्याचा दावा केसरकरांनी केला आहे.

नारायण राणे (Narayan Rane)यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी पवारांनी मदत केली होती. मात्र, राणे यांनी कोणत्या पक्षात जावे याबाबत कोणतीही सूचना केली नव्हती असेही पवारांनी सांगितले होते असा दावा केसरकरांनी केला. छगन भुजबळ यांना स्वत: च शरद पवारांनी शिवसेनेतून बाहेर नेले असल्याचे केसरकर यांनी सांगितले. राज ठाकरे (Raj Thackeray)यांच्या पाठिशी शरद पवार यांचे आशीर्वाद होते असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

दरम्यान, केसरकर यांनी केलेल्या या टीकेवर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नेते सुरज चव्हाण यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, पवार साहेब व कुटुंबीयांवर पाठीमागून टीका,आरोप करणारे या महाराष्ट्रात दिपक केसरकर सारखे भरपूर आहेत.परंतु पवार साहेब व दादांच्या समोर तेच लोक 90 डिग्री मधे पाया पडताना पाहिलंय. असं चव्हाण म्हणाले.