सदावर्तें सारख्या बाजारूला काय समजणार पवार साहेब; राष्ट्रवादीची सदावर्तेंवर टीका

Mumbai – केंद्रातील सत्ताधारी भाजपाने लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली असून सर्व विरोधकांनी राष्ट्रपतीपदासाठी सक्षम उमेदवार ठरवावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, असा शिवसेनेचा आग्रह आहे. मात्र शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात ही निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. विरोधी पक्षांच्या बुधवारी झालेल्या या बैठकीत अनेक पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना संयुक्त विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होण्यासाठी विनंती केली, मात्र त्यांनी पुन्हा एकदा ही ऑफर धुडकावून लावली.

दरम्यान, आकड्याचं गणित पाहाता सत्ताधारी एनडीएकडे आघाडी आहे. त्यात जर बीजद, अन्नाद्रमुकआणि युवजन श्रमिक रायथू काँग्रेस पार्टी (वाईएसआरसीपी) यासारख्या पक्षाचं समर्थन मिळाल तर एनडीएच्या उमेदरावाचा विजय निश्चित मानला जातोय. यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली आहे. राष्ट्रपती पदासाठी विशिष्ट राजकीय उंची लागते, अशा शब्दात गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवारांवर टीका केली.

राष्ट्रपती पदावर उंची गाठलेली माणसे होती. शरद पवार यांच्याबद्दल काय बोलणार ते वयोवृद्ध आहेत. त्यांनीच सांगावे त्यांच्याकडे कुठली उंची आहे, असा प्रश्न विचारत सदावर्ते यांनी शरद पवार यांना टोला लगावला. कारण राष्ट्रपती पदासाठी उंची लागते त्यामुळे त्यांनीच विचार करावा, या पदावर जायचे की नाही, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले. मेडिकलच्या प्रवेशासाठी सीईटीची परीक्षा होते. आयएएस होण्यासाठीही परीक्षा असते. मला वाटते की, वाजवण्यासाठी चर्चा ठीक आहे. परंतु राष्ट्रपतीपदासाठी उंची लागते. तसेच बौद्धिक पातळी आवश्यक आहे. शरद पवार यांना चर्चेतून वाजवले जात आहे, असा घणाघात गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावर केला.

दरम्यान, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण (Nationalist Youth Congress Working President Suraj Chavan) यांनी सदावर्ते यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. ते म्हणाले, पवार साहेबाची उंची समजला बौद्धिक क्षमता,चांगली दृष्टी व लायकी लागते सदावर्तें सारख्या बाजारूला काय समजणार पवार साहेब. असं म्हणत चव्हाण यांनी पलटवार केला आहे.