भारताचा ‘हा’ स्टार खेळाडू पहिल्या सत्रात अनसोल्ड ! ४ वेळा विजेता संघाचा खेळाडू

मुंबई : आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाने जबरदस्त कामगिरी बजावली आहे. मागील हंगामात देखील या संघाने आयपीएलचा कप आपल्या हातात घेऊन उंचावला. टाटा आयपीएल २०२२ च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा स्टार फलंदाज सुरेश रैना लिलावाच्या पहिल्या सत्रात अनसोल्ड राहिला आहे. चेन्नई सुपर किंग्जकडू न खेळताना रैनाने अनेक महत्वाचे सामने एकहाती जिंकून दिले. मात्र यावेळी चेन्नई सुपर किंग्ज संघ सुरेश रैनाला संघात घेण्यात अपयशी ठरला आहे.

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२२ साठी रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड, मोईन अली यांना संघात कायम राखले आहे. तर अष्टपैलू खेळाडू ब्रोव्होला देखील ४.४० कोटी रुपये खर्च करून संघात परत विकत घेतलं आहे. सुरेश रैनाची बेस प्राईस २ कोटी रुपयांची होती. मात्र त्याला कोणत्याही संघाने पहिल्या सत्रात विकत घेतलं नाही.

आँस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ देखील अनसोल्ड राहिला आहे. मागील हंगामाच्या आयपीएल लिलावात दिल्ली कॅपिटल्सने त्याला 2.2 कोटी रुपयांची बोली लावून संघात घेतले होते. तसेच बांगलादेश संघाचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन देखील अनसोल्ड राहिला आहे. डेव्हिड मिलर देखील या आयपीएल लिलावाच्या पहिल्या सत्रात अनसोल्ड राहिला.