Sushma Andhare | ज्या मुंडे साहेबांची बॅग घेऊन फडणवीस फिरायचे त्यांच्याच कन्येला उमेदवारी का नाही? सुषमा अंधारेंचा खोचक सवाल

Sushma Andhare on Pankaja Munde : महाराष्ट्रात आगामी राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Elections) दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. भाजपाकडून राज्यसभेसाठी ३ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांना भाजपानं महाराष्ट्रात राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. मात्र भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाचा विचारही केला गेला नाही. यावरुन उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, मला पंकजा मुंडे यांचे वाईट वाटतं आहे. ज्या मुंडे साहेबांची बॅग घेऊन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) फिरायचे त्याच मुंडे साहेबांच्या कन्येला राजकारणातून संपवण्याचे षडयंत्र पूर्णत्वास नेलं आहे. ही जागा पंकजा मुंडे यांना मिळेल असे वाटलं होतं. भाजपमध्ये निष्ठावंतवर अन्याय आणि बाहेरून आलेल्या लोकांची चांदी होत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात नेते घडवण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे बाहेरचे लोक त्यांना पक्षात घ्यावे लागत आहेत. सरकार कमालीचे असंवेदनशील आहे. गृहमंत्र्यांच्या पत्नीवर घरात स्पाईन होण्याचे प्रकार घडतात मग सर्वसामान्य मुलींचे काय? असा सवालही सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या

Medha Kulkarni | “..एवढीच मागणी मी पक्षाकडे केली होती”, राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया

Rajyasabha Election: राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल राज्यसभेवर जाणार

महायुतीच्या उमेदवारांची यादी पाहून किव येते, भाजपसाठी जीव ओतलेल्यांनाच जागा नाही – Nana Patole