‘Indrani Balan Foundation’ व ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ मध्ये सामंजस्य करार, शालेय सुविधांसाठी 3 कोटींची मदत

पुणे :  ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ (Indrani Balan Foundation) ‘आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थे’च्या (Art of Living Institute) शाळांसाठी ३ कोटी रुपयांची मदत करणार आहे. याबाबत इंद्राणी बालन फाऊंडेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला.

‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ने शैक्षणिक क्षेत्रात मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. यातूनच हा सामंज्यस्य करार करण्यात आला. यावेळी अध्यात्मिक गुरू रविशंकर आणि त्यांच्या भगिनी भानुमती यांची उपस्थिती होती. हा करार पुणे येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या त्रिवेणी आश्रम येथे करण्यात आला. या कराराप्रमाणे ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ (Indrani Balan Foundation) तीन गावातील शाळा बांधण्यासाठी मदत करणार आहे. त्यासोबतच येथे विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या इतर पायाभूत सुविधांचीही उभारणी करण्यात येणार आहे.

‘इंद्राणी बालन फाऊंडेशन आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिखर शिंगणापूर (Shikhar Shingnapur) येथील शाळेच्या चार वर्गखोल्या, स्वच्छतागृह आणि वर्गाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार आहे. तसेच येथे विद्यार्थ्यांसाठी ३२ आसनी स्कूल बस सुध्दा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या दहिगाव येथील शाळेसाठी चार वर्गखोल्या, स्वच्छतागृह आणि वर्गाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यासोबतच देवाची झाली या गावातील शाळेत ही चार वर्गखोल्या, स्वच्छतागृहाचे बांधकाम आणि वर्गाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. या कामांसाठी अंदाजे किंमत ३ कोटी रुपये लागणार आहेत. ही कामं तातडीने पूर्ण करुन येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याचा विद्यार्थ्यांना लाभ कसा होईल, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

Medha Kulkarni | “..एवढीच मागणी मी पक्षाकडे केली होती”, राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया

Rajyasabha Election: राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल राज्यसभेवर जाणार

महायुतीच्या उमेदवारांची यादी पाहून किव येते, भाजपसाठी जीव ओतलेल्यांनाच जागा नाही – Nana Patole