पुढील आठवड्यात आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा होणार, ‘हे’ दोन दिग्गज खेळाडू वापसी करणार

Asia Cup 2023, Team India Squad: 2023 आशिया चषक सुरू होण्यासाठी 20 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. मात्र, भारतीय क्रिकेट बोर्डाने अद्याप या स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केलेला नाही. रिपोर्टनुसार, पुढील आठवड्यात बीसीसीआय आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा करू शकते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुढील आठवड्यापर्यंत 2023 आशिया कपमध्ये सहभागी होणारे सर्व संघ त्यांच्या संघांची घोषणा करतील. बीसीसीआयला आपला संघ निवडण्यात अडचणी येत आहेत, कारण संघातील अनेक प्रमुख खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त नाहीत.

आशियाई क्रीडा स्पर्धेत निवड न झाल्याने निराश झालेल्या शिखर धवनला पुन्हा एकदा टीम इंडियात स्थान मिळणार नाही. आशिया चषकात रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीचे प्रबळ दावेदार आहेत. मात्र, ईशान किशनचा संघात राखीव सलामीवीर आणि यष्टिरक्षक म्हणून समावेश केला जाऊ शकतो.

यानंतर मधल्या फळीबद्दल बोलायचे तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळणार हे नक्की. दुसरीकडे, जर श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर संघात परतला, तर सूर्यकुमार यादवलाही त्याचे कव्हर म्हणून निवडले जाऊ शकते. यानंतर केएल राहुल संघाचा मुख्य यष्टिरक्षक असेल, जो पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करेल.

अष्टपैलू खेळाडूंबद्दल बोलायचे तर रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर यांचा यात सहभाग असेल. फिरकी विभागाची धुरा कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्या हातात असेल. वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमराहचे पुनरागमन निश्चित आहे. त्याच्यासोबत मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार अ‍ॅक्शन करताना दिसणार आहेत.

२०२३ आशिया चषक स्पर्धेसाठी भारताचा संभाव्य १५ सदस्यीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत सिराज, मोहम्मद सिराजू युझवेंद्र चहल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि मुकेश कुमार.