टीम इंडियाच्या ‘या’ पाच खेळाडूंना करावी लागणार अफलातून कामगिरी; अन्यथा कांगरू मारतील बाजी

IND vs AUS World Cup 2023 Ahmedabad: विश्वचषक 2023 चा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल . हा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. भारताने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. यावेळी विजेतेपदासाठी पाच भारतीय खेळाडूंची कामगिरी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सर्वांच्या नजरा रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा (Rohit Sharma, Virat Kohli, Mohammed Shami, Jasprit Bumrah and Ravindra Jadeja)  यांच्यावर असतील.

भारताला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी रोहितवर असेल. शुभमन गिलसोबत भक्कम भागीदारी करणे त्याच्यासाठी महत्त्वाचे असेल. रोहितने या विश्वचषकात अनेक सामन्यांत भारताला चांगली सुरुवात करून दिली आहे. अफगाणिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड आणि पाकिस्तानविरुद्ध त्याने चांगली कामगिरी केली. रोहितने अफगाणिस्तानविरुद्ध १३१ धावा, पाकिस्तानविरुद्ध ८६ धावा, बांगलादेशविरुद्ध ४८ धावा आणि इंग्लंडविरुद्ध ८७ धावा केल्या होत्या.

कोहली या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने तीन शतकेही झळकावली आहेत. विराटच्या बॅटने काम केल्यास भारतासाठी विजय सोपा होईल. उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्धही त्याने शतक झळकावले होते. यापूर्वी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १०१ धावांची नाबाद खेळी खेळली होती.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उपांत्य फेरीत भारताकडून 7 विकेट घेतल्या. त्याने न्यूझीलंडचे कंबरडे मोडले. शमीला अंतिम फेरीतही अप्रतिम कामगिरी करावी लागणार आहे. या विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो अव्वल आहे. शमीने 6 सामन्यात 23 विकेट घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराह पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने 10 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत. बुमराहची कामगिरीही संघासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

अंतिम सामन्यात जडेजाला अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडावी लागणार आहे. हार्दिक पंड्या दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर आहे. पंड्याने अष्टपैलू म्हणून चांगली कामगिरी केली आहे. वेगवान गोलंदाज म्हणूनही तो संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावत होता. आता जबाबदारी जडेजावर असेल. फिरकी गोलंदाजी करताना कुलदीप यादवसह जडेजाला गोलंदाजीत चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या-