पाकिस्तानात इम्रान खान विरोधात निवडणूक लढवणार 26/11चा मास्टरमाईंड दहशतवादी सईदचा मुलगा

Imran Khan vs Hafiz Saeed : 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा मुलगा तलहा सईद माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात निवडणूक (Pakistan Elections) लढवणार आहे. त्यांनी लाहोरच्या NA-122 मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. इम्रान खान यांनीही याच जागेवरून उमेदवारी दाखल केली आहे.

पाकिस्तानात पुढील वर्षी 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग (पीएमएमएल) ने उमेदवार उभे केले आहेत. हा पक्ष हाफिज सईदने स्थापन केला आहे. खुर्ची हे त्याचे निवडणूक चिन्ह आहे.

पाकिस्तानला इस्लामिक कल्याणकारी राज्य बनवण्याचा उद्देश
पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीगचे प्रमुख खालिद मसूद सिंधू यांनी व्हिडिओ संदेश जारी केला आहे. त्यात त्यांनी पीएमएमएल बहुतांश जागांवर निवडणूक लढवत असल्याचे म्हटले आहे. आमचा उद्देश देशातील भ्रष्टाचारासाठी सत्ता काबीज करणे हा नाही तर पाकिस्तानला इस्लामिक कल्याणकारी राज्य बनवणे हा आहे.

सिंधू लाहोरच्या NA-130 मतदारसंघातून उमेदवार आहेत. ते पाकिस्तान मुस्लिम लीगचे प्रमुख माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. मात्र, हाफिज सईदशी पक्षाचा कोणताही संबंध नाही, तसेच त्याला कोणत्याही प्रकारचा पाठिंबा नसल्याचा दावा सिंधूने केला आहे.

2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी PMML पक्षाची स्थापना
उल्लेखनीय आहे की 2018 साली स्थापन झालेली मुस्लिम लीग (MML) हा जमात उद दावा या प्रतिबंधित संघटनेचा राजकीय चेहरा होता. त्यांनी जवळपास सर्वच जागांवर उमेदवार उभे केले होते. विशेषत: पंजाब प्रांतात ती जिंकण्यासाठी जोर देण्यात आला. मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. एमएमएलवरील बंदीमुळे 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी पीएमएमएल पक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

ठाकरेंनी कोरड्या विहिरीत उडी मारायला लावली तरी मारेन; लोकसभेबाबत अंबादास दानवे स्पष्टच बोलले

शेअर मार्केटमध्ये महिन्याभरात कमावले ६५० कोटी, ‘या’ महिलेची अविश्वसनीय कामगिरी

40 लाखांची साडी आणि 100 कोटींची कार, असे आहे Neeta Ambani यांचे विलासी जीवन