झाला पचका : शीतल म्हात्रेंनी ट्वीट केलेला सुप्रिया सुळेंचा ‘तो’ फोटो एडिटेड

मुंबई – काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसलेला फोटो सोशल मीडियावर व्हयरल झाला. त्यानंतर विरोधकांकडून श्रीकांत शिंदे यांच्यासह सरकारवर चांगलाच निशाणा साधला. त्यानंतर शिंदेगटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी ट्वीटरवर सुप्रिया सुळे यांचा एक फोटो पोस्ट केला.

म्हात्रे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केल्या फोटोमध्ये सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेल्या दिसत आहेत. तर, शेजारी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बसलेले दिसत आहेत. दरम्यान, या फोटोमध्ये सुप्रिया सुळेंचा जो फोटो आहे तो आधीच्या एका कार्यक्रमामधील असून तो फोटो सुप्रिया सुळेंनी आधीच फेसबूकवर पोस्ट केला आहे. तोच फोटो एडिट करून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसवल्याचं समोर आलं आहे.