मुख्यमंत्र्यांचे पदावर राहणं, हे नैतिकतेला धरून नाही – थोरात 

Maharashtra Political crisis –   महाराष्ट्र आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे सत्ता संघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या निकालात शिवसेना भाजप सरकारला दिलासा दिला असला तरीही एकनाथ शिंदेनी नेमलेले व्हीप भरत गोगावले बेकायदेशीर आहेत असे न्यायालयाने म्हटले आहे.राज्यपालांचे भूमिकेवर ताशेरे ओढत  उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राजीनामा दिला नसता तर आम्ही परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले असते असं कोर्टाने म्हटले आहे.

दरम्यान, या निकालानंतर कॉंग्रेसने सरकारवर टीका केली आहे. जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी याच मुद्द्यावरून सरकारवर शरसंधान केले. ते म्हणाले, राज्यपालांची भूमिका बेकायदेशीर, अध्यक्षांचं वागणं बेकायदेशीर, शिंदे गटाकडून केलेली व्हीपची नियुक्ती बेकायदेशीर, असे असताना या सरकारला आपण कायदेशीर कसे म्हणू शकतो? विद्यमान मुख्यमंत्र्यांचे पदावर राहणं, हे नैतिकतेला धरून नाही.आस थोरातांनी म्हटले आहे.