सिग्नलवर गाडी थांबली आणि सदाभाऊ खोत यांनी भर रस्त्यात नको ते किळसवाणे कृत्य केले

Sadabhau Khot  :  राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे नेहमीच वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत येत असतात. आता यावेळी देखील ते चर्चेत आले असून कारण जरा किळसवाणे आहे. खोत हे रस्त्यावर पचापच थुंकत असतानाची दृश्ये थेट यांची एबीपी माझा या वाहिनीच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

दक्षिण मुंबईत सिग्नलवर (South Mumbai Signal) सदाभाऊंची इनोवा गाडी थांबली आणि सदाभाऊं गाडीचा दरवाजा उघडून दोनदा रस्त्यावर थुंकले. राज्याच्या एका माजी मंत्र्याने आणि लोकप्रतिनिधीने हे असं वागलं तर सर्वसामान्यांनी काय करायचं असा सवाल उपस्थित होतोय.

ABPच्या वृत्तानुसार, नागरिकांनी रस्त्यावर थुंकू नये म्हणून राज्य सरकार मोहीम राबवतं, त्या-त्या ठिकाणचे प्रशासन स्वच्छतेचे संदेश देत नागरिकांनी असं करू नये यासाठी प्रयत्न करते. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास आर्थिक दंडाचीही तरतूद आहे. सर्वसामान्यांकडून हा दंड वसूल केला जातो. आता राज्याच्या माजी मंत्र्याने रस्त्यावर थुंकून नियमांची पायमल्ली केली केल्याचं दिसून आलं.