‘उर्फी नाव मुस्लीम नाही हे ठरवणारा तू कोण?’, फतवा जारी करणाऱ्याची उर्फी जावेदने केली बोलती बंद

Mumbai- टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) हिच्या अडचणी वाढणार आहेत. कारण अभिनेता फैजान अन्सारी याने उर्फीविरोधात फतवा (Urfi Javed Fatwa) काढला आहे. इतकंच नाही तर उर्फीला निधनानंतर कबरस्तानातही जागा मिळू नये म्हणून फैजान अन्सारीने जुहू  कबरस्तानात अर्ज केला आहे. आता या प्रकरणावर उर्फीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

उर्फीने म्हटले आहे की, ‘हा रिकामटेकडा माणूस आहे कोण? हा माणूस इतका रिकामटेकडा आहे की सगळ्या कबरस्तानात जाऊन अर्ज देत आहे. या व्यक्तीला प्रसिद्धी हवी आहे. त्याला लोकांचे अटेंशन हवे आहे. म्हणून तो स्वतः जाऊन हे सगळं सांगत आहे. ठीक आहे काय बोलू मी यावर.’

तसेच उर्फी हे नाव मुस्लिम नसल्याचे ऐकताच उर्फी चिडली. तर उर्फीने उलट प्रश्न करत त्या व्यक्तीलाच ‘तू आहेस कोण? उर्फी नाव मुस्लिम नाही हे ठरवणारा तू कोण आहेस?’ असे विचारले आहे.