LokSabha Election 2024 | विरोधकांना पोटदुखी होणे स्वभाविक आहे कारण त्यांना दोन राष्ट्रभक्त एकत्र आलेले कसे पाहवेल ?

LokSabha Election 2024 | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या मनसेच्या वार्षिक मेळाव्यात ते बोलत होते. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी आपल्या पक्षानं बिनशर्त पाठिंबा देऊ केल्याचं राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे मनसे महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढवणार नाही आणि सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना मदत करणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

भाजपा प्रवक्ते प्रवीण अलई यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली असून विरोधकांना टोला देखील लगावला आहे. ते म्हणाले,  मनसेना प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महायुतीला (LokSabha Election 2024) दिलेल्या पाठींब्याचे मी मनापासून स्वागत करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेला दिलेला हा पाठींबा आहे. राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला शिवतीर्थावरुन दिलेला बिनशर्त पाठिंबा, हा त्यांचा देशाच्या विकासाबद्दल असलेल्या खऱ्या भावनेला अधोरेखित करतो. विरोधकांना पोटदुखी होणे स्वभाविक आहे. कारण त्यांना दोन राष्ट्रभक्त एकत्र आलेले कसे पाहवेल ? राजसाहेब ठाकरे यांचे पुन्हा एकदा आभार.असेप्रवीण अलई यांनी म्हटले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; पहा कुणाला मिळाली संधी

Ravindra Dhangekar | आघाडीत बिघाडी : पुण्यात शिवसेना उबाठाचा रविंद्र धंगेकरांच्या प्रचाराला ‘जय महाराष्ट्र’

Nana Patole Accident: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भीषण अपघात, गाडीचा चुराडा