सेनेच्या अडचणी वाढल्या; शिवसेनेचा आणखी एक आमदार आज शिंदे गटात सहभागी होणार ?

मुंबई – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. ४० पेक्षा जास्त शिवसेना आमदार आणि इतर अपक्ष आमदारासमवेत एकनाथ शिंदे गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. भाजपासोबत शिवसेनेनं हातमिळवणी करून सरकार स्थापन करावं अशी अट त्यांनी पक्षाला घातली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Chief Minister Uddhav Thackeray)  हे कदापि शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या 40 पेक्षा अधिक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याने शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत. महाविकास आघाडी (MVA)सरकार अल्पमतात आल्याचे चित्र आहे. रविवारी उदय सामंत (Uday Samant) हे देखील शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आता आज आणखी एक धक्का शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे शिवसेनेचा आणखी एक आमदार आज शिंदे गटात सहभागी होणार आहे. हा आमदार आज दुपारी मुंबईहून गुवाहाटीला जाण्याची शक्यता आहे.