‘विश्वासघाताने मिळालेली सत्ता हातची गेल्यामुळे मविआ सरकारच्या नेत्यांचे मानसिक संतुलन ढासळले’

मुंबई – गायवर्गीय पशूंना ‘लम्पी स्किन डिसीज’ (Lumpy skin disease) या साथीच्या रोगाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये या आजाराची साथ परसली आहे. तसेच, यावरती उपाय रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे रोगाचा संसर्ग होण्याचा वेग कमी आला आहे. त्यात आता महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी लम्पी रोगाबाबत अजबच दावा केला आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले, “लम्पी हा आजार नायजेरियातून आला आहे. देशात चित्तेही नायजेरियातून आणले आहे. चित्त्यांच्या आणि गायींच्या अंगावरील ठिपके सारखेच आहेत. मोदी सरकारने (Modi Government) जाणून बुजून शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासाठी चित्त्यांना भारतात आणले,” असे नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, पटोले यांनी केलेल्या या पोरकट दाव्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी समाचार घेतला आहे. त्या आपल्या ट्वीट मध्ये म्हणतात, लम्पी आजार नायजेरियातून आला असून, चित्तेही तिथूनच आणले आहेत..चित्त्यांच्या आणि गायींच्या अंगावरील ठिपके सारखेच आहेत इति नाना पटोले. विश्वासघाताने मिळालेली सत्ता हातची गेल्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. नाना, चांगल्या मानसोपचार तज्ञाला दाखवा. असा सल्ला वाघ यांनी दिला आहे.