राज्यपाल करायला नको ते करून गेले पण आता त्यांना शिक्षा काय? उद्धव ठाकरेंचा सवाल

Maharashtra Political crisis –   महाराष्ट्र आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे सत्ता संघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या निकालात शिवसेना भाजप सरकारला दिलासा दिला असला तरीही एकनाथ शिंदेनी नेमलेले व्हीप भरत गोगावले बेकायदेशीर आहेत असे न्यायालयाने म्हटले आहे.राज्यपालांचे भूमिकेवर ताशेरे ओढत  उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्ही परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले असते असं कोर्टाने म्हटले आहे.

दरम्यान, या निकालानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. आजच्या निर्णयाने सत्तेसाठी हपापलेल्या उघड्यानागड्या राजकारणाची चिरफाड झाली आहे, असा जोरदार हल्ला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

राज्यपाल करायला नको ते करून गेले पण आता त्यांना शिक्षा काय? राज्यपाल घरचा चाकर असल्याप्रमाणे वागवण्याची पद्धत सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यपाल ही यंत्रणा ठेवावी की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे असा घणाघात ठाकरे यांनी केला आहे.