आपत्तीग्रस्तांसाठी बचाव व मदतकार्य तात्काळ सुरु करा, अजितदादांचे आदेश

ajit pawar

मुंबई : बंगाल उपसागरातल्या गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी, पुरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असलेले जलसंपदामंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.

उस्मानाबाद जिल्ह्यात पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल पूरग्रस्त मराठवाड्यात पाठवण्यात आले असल्याचेही त्यांना सांगितले.

अरबी समुद्रात शाहीन चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवल्यानं रेड अलर्ट असलेल्या पालघर, नाशिक, औरंगाबाद, जालना, जळगाव या जिल्ह्यांच्या तसंच ऑरेंज अलर्ट असलेल्या मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांच्या प्रशासनाला अधिक सतर्क राहण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

राज्य व जिल्ह्यांच्या आपत्कालिन मदत यंत्रणांनी सतर्क आणि परस्परांच्या संपर्कात राहून आपत्तीग्रस्तांसाठी बचाव व मदतकार्य तात्काळ सुरु करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हा आपत्कालिन मदत यंत्रणांना दिल्या आहेत.

हे वाचलंत का ? 

Previous Post
aaditya thackeray

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीस भेट

Next Post
aaditya thackeray

पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणे काळाची गरज – आदित्य ठाकरे

Related Posts
devendra fadanvis

महाराष्ट्रातील राजकीय महाभारतामागे भारतीय जनता पक्षाचाच हात – पटोले

मुंबई – राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकीय अस्थिरतेला भारतीय जनता पक्षच जबाबदार आहे. ईडीची भिती दाखवून सरकार पाडण्याचा…
Read More

‘उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ओबीसी समाजाचा मुख्यमंत्री होऊ शकतो; तर महाराष्ट्रात का नाही?’

ठाणे : राज्यात काही दिवसांपूर्वी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा खूप गाजला होता. त्यामुळे अलीकडेच शहरात राज्यस्तरीय ओबीसी शिबिराचे आयोजन…
Read More
NDA Govt | नव्या सरकारमध्ये कोणते मंत्रीपद कोणाला मिळणार, भाजप कोणती मंत्रिपदे स्वतःकडे ठेवणार?

NDA Govt | नव्या सरकारमध्ये कोणते मंत्रीपद कोणाला मिळणार, भाजप कोणती मंत्रिपदे स्वतःकडे ठेवणार?

केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA Govt) अर्थात एनडीएचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झाल्यानंतर काल नवी दिल्लीत त्या…
Read More