क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार ३ जानेवारीला वितरीत करा – देवयानी फरांदे

नागपूर – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार ३ जानेवारीला वितरीत करण्याची मागणी आ. देवयानी फरांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली. याबाबत दिलेल्या पत्रात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय काम लक्षात घेऊन आपल्या सरकारने आदर्श शिक्षक पुरस्कार क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावे देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयासाठी आ. देवयानी फरांदे यांनी शासनाचे आभार व्यक्त केले

सन २०२२ च्या पुरस्काराची तयारी पूर्ण झालेली असून घोषित करणे बाकी असल्याची माहीती प्राप्त होत आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारी रोजी असते त्या दिवशी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करणे अवचित्याला धरून असल्याचे स्पस्ट करताना .क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२ घोषित करून ३ जानेवारीला वितरीत करणे करण्याची मागणी आ. देवयानी फरांदे यांनी केली. याबाबत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश सचिव शालेय शिक्षण यांना दिले .