गोंधळच गोंधळ…! पाकिस्तानी हसीना सीमा हैदरचे किती ‘प्रियकर’? आता समोर आला आणखी एक ‘lover’!

चार मुलांची पाकिस्तानी आई सीमा हैदर (Seema Haidar) पब्जी गेम खेळणारा भारतीय तरुण सचिनच्या प्रेमात पडली. ही महिला प्रेमात इतकी वेडी झाली होती की, ती अवैधरित्या नैपाळमार्गे तिच्या चार मुलांसह भारतात आली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू केली. सीमा हैदर भारतीय तरुण सचिनसोबत राहात असली तरीही तिच्या पतीने भारत सरकारकडे सीमाला पाकिस्तानात परत पाठवण्याची मागणी केली आहे.

स्वतःला सीमा हैदरचा एक्स प्रियकर म्हणवणाऱ्या पाकिस्तानातील एका तरुणाने सीमा संदर्भात धक्कादायक दावे केले आहेत. या तरुणाने, सीमाचा भारतात येण्यामागील खरा उद्देश आणि पाकिस्तानला परतण्याची वेळही सांगितली आहे. ‘लोकमत’ने हे वृत्त दिले आहे.

पाकिस्तानी महिला सीमा हैदरसोबत PUBG खेळणारा आणखी एक तरुण समोर आला आहे. पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या या तरुणाने दावा केला आहे की, तो सीमाच्या दोन वर्षांपासून संपर्कात होता. पाकिस्तानातील एका यूट्यूब चॅनलने या तरुणाची मुलाखत दाखविली आहे. यात त्याने, सीमासोबत आपली मैत्री होती, आपण सीमाला भेटलोही आहोत. तसेच, आम्ही लग्न करण्याचेही ठरवले होते, असे म्हटले आहे.

या पाकिस्तानी तरुणाने दावा केला आहे की, सीमा क्रिकेटची चाहती आहे. तिचा भारतात पोहचण्याचा हेतू केवळ वर्ल्डकप 2023 पाहणे आहे. वर्ल्डकप पाहिल्यानंतर, सीमा पुन्हा तिचा पती गुलाम हैदर कडे जाईल.