मुख्यमंत्री असावा तर असा : एम्ब्युलन्स ट्रॅफिकमध्ये अडकलेली पाहून मुख्यमंत्र्यांचा पारा चढला, आणि मग….

नागाव- आसामचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते हिमंता बिस्वा सरमा शनिवारी त्यांच्या भेटीदरम्यान नागावमध्ये लांब ट्रॅफिक जाम दिसल्याने चांगलेच संतापले. त्यांनी या परिस्थितीबद्दल तेथील उपायुक्तांना (डीसी) फटकारले आणि नंतर सांगितले की  आजच्या आसाममध्ये व्हीआयपी संस्कृती चालणार नाही.

एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सरमा ट्रॅफिक जाममुळे रागावलेले दिसत आहेत जेव्हा त्यांनी नागाव भागातील डीसीला फोन केला. त्याने डीसीला विचारले,  अरे डीसी साहेब हे काय नाटक आहे. क्यूँ गढ़ी रुका है? कोणी राजा महाराजा आरा आहे का? भविष्यात याची पुनरावृत्ती होऊ नये, असे सरमा यांनी सरकारी अधिकाऱ्याला सांगितले.

राष्ट्रीय महामार्ग 37 वरील गुमोठागावजवळ ही घटना घडली. महामृत्युंजय मंदिरात प्रार्थना करण्यासाठी मुख्यमंत्री आदल्या दिवशी नागावमध्ये होते. ट्विटरवर त्यांनी मंदिरात प्रार्थना करतानाचे फोटो शेअर केले आहेत. गुमुथा गाव आणि महा मृत्युंजय मंदिर यांना NH-37 ला जोडणाऱ्या रस्त्याच्या बांधकामाच्या कामाचे उद्घाटन करतानाची छायाचित्रेही त्यांनी शेअर केली.

सरमा यांनी नंतर सांगितले की त्यांनी त्यांच्यासाठी  वाहतूक थांबवण्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना फटकारले, त्यांच्या नागावच्या भेटीदरम्यान लोकांची गैरसोय होऊ नये अशा स्पष्ट सूचना असूनही वाहतुकीचा खोळंबा केला होता. एम्ब्युलन्ससह अनेक वाहने NH वर १५ मिनिटांपेक्षा जास्त काळ अडकून पडली होती. ही VVIP संस्कृती आजच्या आसाममध्ये मान्य नाहीअसं सरमा म्हणाले.