महाराष्ट्रातील ‘या’ गावांना महावितरण कर्मचारी संपाचा अजिबात फरक पडला नाही; हे आहे कारण…

चंद्रपूर – महावितरण विभागाचे खाजगीकरण करू नये यासाठी महावितरणचे कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. या संपाच्या प्रभाव राज्यातील अनेक जिल्ह्यात आज पहाटेपासूनच दिसू लागला. अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रातील 14 गावांना मात्र कसलाही फरक पडलेला नाही. सीमावर्ती भागात असलेल्या या गावांना थेट तेलंगणातून वीज पुरवठा सुरू आहे.

चंद्रपूर जिल्हाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या या गावांची नावे लेंडीगुडा, भोलापठार, नारायण गुडा, ईसापुर, अंतापुर, पद्मावती, इंदिरानगर, परमडोली, मुक्कदमगुडा, कोटा, शंकरलोधी, महाराज गुडा, लेंडीजाळा आणि कामतनगर असे गावांची नावे आहेत. या चौदा गावांना तेलंगणा राज्यातून वीज पुरवठा केला जातो. तेलंगणा राज्यातील आसिबाबाद जिल्ह्यात येणाऱ्या केरामेरी मंडल ( तालुका ) येथून 14 गावांना वीज पुरवठा करण्यासाठी 20 किमी अंतर वीज वाहिनी पसरवण्यात आली आहे. या चौदा गावांची लोकसंख्या अंदाजे ३५०० आहे. तर कुटुंब संख्या १२०० चा आसपास आहे.

या गावात केवळ तेलंगणाचीच वीज आहे असे नाही. महाराष्ट्र सरकारनेही या गावात वीज वाहिन्या पसरविल्या आहेत. महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यातील वापरलेल्या विज देयक येथील नागरिक भरतात. त्यामुळे खाजगीकरणाच्या विरोधात महाराष्ट्रात विज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपाच्या या गावांना कुठलाही फटका बसला नाही.