मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचा लेस्बियन लिपलॉक, ‘क्राईम बीट’चा ट्रेलर होतोय व्हायरल

टीव्हीनंतर ओटीटी प्लॅटफॉर्म आल्याने प्रेक्षकांना वेबसीरिजचे वेड लागले आहे. प्रेक्षकांच्या मागणीनुसार चित्रपट निर्मातेही वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. अशातच आता ‘क्राईम बीट’ (Crime Beat) ही वेबसिरिज सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. या सिरिजचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमधील विशेषत: मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या बोल्ड सीनने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.

काही दिवसांपूर्वीच मराठी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) हिच्या ‘सिटी ऑप ड्रिम्स’ वेबसिरीजमधील लेस्बियन सीनची भरपूर चर्चा झाली होती. आता सई अशाच भूमिकेत दिसल्याने प्रेक्षकांचे तिच्याकडे लक्ष वेधले गेले आहे.

सईनं (Sai Tamhankar) तिच्या इन्टाग्राम अकांऊंटवरून तिच्या आगामी वेबसिरिज टीझर प्रदर्शित केला आहे. ज्यात साकीब सलीम, राहूल भट्ट, आदिनाथ कोठारे, सबा आझाद, सई ताम्हणकर, किशोर कदम यांच्या तगड्या भुमिका दिसत आहेत. यावेळी एका सीनमध्ये सईच्या लेस्बियन लिपलॉकची झलक दिसली आहे त्यामुळे चर्चांना एकच उधाण आलं. सईच्या या आगळ्यावेगळ्या भुमिकेसाठी तिच्या चाहत्यांनी तिचे कौतुकही केले आहे. त्यामुळे या टीझरला चांगलेच लाईक्स आणि कमेंट्स आले आहेत. ही सिरिज कॉमनवेल्थ गेम्समधील भ्रष्टाचार आणि राजकीय नेत्यांचा त्यातील संबंध यावर आधारित असल्याचे कळते आहे.