अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन दिसताच ‘ती’ झाली टॉपलेस, व्हिडिओ होतोय व्हायरल

शनिवारी (10 जून, 2023) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊस येथे समलैंगिकांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात एका TikTok सेलिब्रेटीने तिचा टॉप काढला. यानंतर तिने कॅमेऱ्यासमोर तिचे प्रायव्हेट पार्ट उघडपणे दाखवायला सुरुवात केली. या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेनही (President Joe Biden) उपस्थित होते.

हा कार्यक्रम व्हाईट हाऊसमध्ये आयोजित केलेला सर्वात मोठा ‘प्राइड सेलिब्रेशन’ म्हणून ओळखला जात आहे. जून 2023 मध्ये जगभरातील ट्रान्सजेंडर ‘प्राइड मंथ’ साजरा करत आहेत. हे साजरे करण्यासाठी जो बायडेनच्या प्रशासनाने या ट्रान्सजेंडर्सना व्हाईट हाऊसच्या दक्षिण लेनमध्ये आमंत्रित केले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने LGBTQ+ लोक उपस्थित होते.

यावेळी रोझ मोंटोया या ट्रान्सजेंडर मॉडेलने (Transgender Model Rose Montoya) व्हाईट हाऊसमध्ये तिचा टॉप काढला आणि तिचे प्रायव्हेट पार्ट दाखवणारा व्हिडिओ बनवला. रोझ मोंटोयाने तिच्या TikTok हँडलवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. समलैंगिकांनी जो बायडेनसोबत सेल्फीही काढले. यादरम्यान जो बायडेन यांनी ‘हॅपी प्राइड मंथ, हॅपी प्राइड इयर, हॅपी प्राइड लाइफ’ म्हणत त्यांना प्रोत्साहन दिले.

ते म्हणाले की. हे लोक सर्वात धाडसी आणि सर्वात प्रेरणादायी लोक आहेत. सिएटल युनिव्हर्सिटीची पदवीधर रोझ मोंटोया 10 व्या वर्गात पुरुषांकडे आकर्षित होऊ लागली, नंतर उभयलिंगी ट्रान्सजेंडर बनली आणि आता ती सर्वनाम म्हणून ‘she’ आणि ‘them’ वापरते.