मांस खाल्ल्याने राज्यात भूस्खलन आणि ढग फुटण्याच्या घटना घडत आहेत?

Himachal News: हिमाचल प्रदेशातील आयआयटी मंडीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा (Laxmidhar Behera) यांनी विद्यार्थ्यांना मांस न खाण्याची शपथ घेण्याचे आवाहन करताना, राज्यात दरड कोसळण्याच्या आणि ढगफुटीच्या घटना प्राण्यांवरील क्रूरतेमुळे घडत असल्याचा दावा केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना संबोधित करताना बेहरा म्हणाले, जर आपण असेच करत राहिलो तर हिमाचल प्रदेश आणखी बिघडेल… तुम्ही तिथे प्राण्यांची हत्या करत आहात… निष्पाप प्राण्यांना खात आहात. त्याचा पर्यावरणाच्या ऱ्हासाशीही सहजीवनाचा संबंध आहे.

बेहरा म्हणाले, वारंवार भूस्खलन, ढग फुटणे आणि इतर अनेक गोष्टी घडत आहेत, हे सर्व प्राण्यांवरील क्रूरतेचे परिणाम आहेत… लोक मांस खातात  यामुळे हे सर्व घडत आहे. चांगली व्यक्ती बनण्यासाठी काय करावे? मांस खाणे बंद करा असं म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांना मांस न खाण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले.

महत्त्वाच्या बातम्याः

‘देश, संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस, इंडिया आघाडी व राहुल गांधी यांची लढाई सुरु आहे’

वनडे विश्वचषकानंतर राहुल द्रविड सोडू शकतात प्रशिक्षकपद, बीसीसीआयला शोधावा लागणार नवा गुरू

“PM मोदींचे अपयश झाकण्यासाठी सनातन धर्माचा वापर”; उदयनिधींचा भाजपवर पलटवार