“इथून पुढील सर्वच वर्ष…”, अभिनेत्री प्राजक्ता माळीने राज ठाकरेंना वाढदिवसाच्या दिल्या आभाळभर शुभेच्छा

Raj Thackeray Birthday: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आज त्यांचा ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त मनसे सैनिक त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच त्यांच्या घरापुढे गर्दी करायला सुरुवात केली आहे. अशातच मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने देखील राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राज ठाकरेंना पुष्चगुच्छ देतानाचे फोटो शेअर करत प्राजक्ताने लिहिलंय, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष, मा. श्री. राजसाहेबांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.. इथून पुढील सर्वच वर्ष, खासकरून हे वर्ष आपल्या आयूष्यातील सर्वोत्कृष्ट वर्ष ठरो…’ प्राजक्ता माळीच्या या पोस्टची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.