LokSabha Elections 2024 | लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान; राज्यातील पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश

लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Elections 2024) पहिल्या टप्प्यासाठीचं मतदान आज होत आहे. देशभरात 17 राज्यं आणि 4 केंद्रशासित प्रदेशातील एकंदर 102 लोकसभा मतदारसंघात मतदानाला प्रारंभ झाला आहे. राज्यातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघांत आज मतदान होत आहे.

राज्यातल्या या पाच लोकसभा मतदारसंघात (LokSabha Elections 2024) एकंदर 97 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत असून, एकंदर 10 हजार 652 मतदान केंद्रं उभारली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे. या सर्व ठिकाणी मतदान यंत्रणा सज्ज झाली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. मतदारांसाठी पाणी, स्वच्छतागृहांसारख्या सुविधा पुरवल्या आहेत. मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी विविध लोकसभा मतदारसंघात निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात 2133 मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. रामटेकमध्ये 2405, तर नागपूरमध्ये 2105 केंद्रे आहेत. नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघ मिळून 124 संवेदनशील मतदान केंद्रं आहेत. यातल्या सुमारे 50 टक्के मतदान केंद्राचं वेबकास्टिंग होणार आहे. गडचिरोलीत ड्रोनद्वारे देखरेख ठेवली जात आहे तसंच या मतदानासाठी सुरक्षा सैनिक तैनात करण्यात आले आहेत. राज्यातील या पाचही लोकसभा मतदारसंघातील नवमतदारांची संख्या लक्षणीय आहे. 18 ते 19 या वयोगटातील 1 लाख 41 हजार 457 नवमतदार मतदानाचा हक्क बजावतील असा अंदाज आहे.

उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, आसाम, मध्यप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि मेघालय या राज्यांमध्येही आज मतदान होत असून संपूर्ण देशात पहिल्या टप्प्यात एकंदर 1625 उमेदवार रिंगणात आहेत. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील नवीन विधानसभांच्या निवडणुकांसाठीही आजच एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Supriya Sule | माझी लढाई अदृश्य शक्तीच्या विरोधात

Devendra Fadnavis | ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे, विचार करुन मत द्या

Sharad Pawar | गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्य जनतेला केवळ फसवण्याचं काम झाले