महाविकास आघाडीत बिघाडी; सावरकरांचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेसला धडा शिकवण्यासाठी ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय 

मुंबई –  कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवल्यानंतर काँग्रेसकडून आज सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे.पण या बैठकीवर शिवसेना- ठाकरे गटाकडून मात्र बहिष्कार घातला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना याची माहिती दिली. राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल काढलेल्या उद्गाराचा निषेध म्हणून ठाकरे गटाकडून याचा या बैठकीवर बहिष्कार घातला आहे.

राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात सावरकरांवर टीका करणे, त्यांना माफिवीर म्हणणं अशा प्रकारची टीका आम्ही खपवून घेणार नसल्याचे यावेळी राऊतांनी सांगितले. आमच्या अनेक पिढ्या आम्ही लहानपणापासून सावरकरांकडून प्रेरणा घेऊन लढाईला उतरलो आहोत.

मालेगावच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)ते स्पष्ट केले आहे. आज सामनातून सुद्धा आमची भूमिका स्पष्ट केली आहे. मला असं वाटतं की, मी आज दिल्लीला जाणार आहे. या विषयावर राहुल गांधींना याविषयावर बोलणार आहे.