मोठी बातमी! अंबादास दानवे शिंदे गटाच्या संपर्कात, संजय शिरसाट यांचा मोठा दावा

 छत्रपती संभाजीनगर  : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेतून सातत्याने शिंदे गटावर टीका करत आहेत. मात्र आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंवर खोचक टीका केली आहे. ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. पण, तिने काय-काय लफडी केली आहे, हे तिलाच माहीत, असे विधान त्यांनी केले.

आम्ही आमची ३८ वर्षे शिवसेनेसाठी घालवली. आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत. ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. मात्र तिने काय-काय लफडी केली आहे, हे तिलाच माहित. अरे पण तू आहे तरी कोण? असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

संजय शिरसाट यांनी दावा केला आहे की अंबादास दानवे माझ्या संपर्कात आहेत. कधीही काहीही होऊ शकतं. अंबादासने मला सांगितलं बाई (सुषमा अंधारे)खूप डोक्याच्या वर झाली. राजकारणात तुम्ही असं काही समजू नका कधीही काहीही होऊ शकतं. असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. संजय शिरसाट यांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.