अगं पोरी पदर तरी सांभाळ…! साडी घालूनही ट्रोल झाली उर्फी जावेद, व्हिडिओ होतोय व्हायरल

नवी दिल्ली: सोशल मीडिया सेंसेशन उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या आगळ्यावेगळ्या ड्रेसिंग स्टाईलमुळे नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. रोज काहीतरी अतरंगी कपडे घालत ती ट्रोलर्सचा शिकार बनत असते. अशातच पहिल्यांदा उर्फी देसी लूकमध्ये दिसली. परंतु ती ऊप्स मोमेंटचा शिकार झाली आणि पुन्हा एकदा चाहत्यांनी तिला धारेवर धरले.

विमानतळावर उर्फी उप्स मोमेंटची शिकार 
उर्फी जावेदचा नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ती विमानतळावर दिसत आहे. फिकट गुलाबी आणि केशरी रंगाची साडी आणि अतिशय बोल्ड ब्लाउज परिधान करून उर्फी विमानतळावर आल्याचे व्हिडिओत दिसत आहे. तिथे ती पापाराझींना पिझ्झा देतानाही दिसत आहे.

पण त्यानंतर पोज देण्यासाठी ती पुढे सरकताच तिच्या साडीचा पदर घसरतो. हे एकदा नाही तर अनेक वेळा घडते. व्हिडीओ पाहून स्पष्टपणे कळते की, उर्फीला तिची साडी सांभाळण्यात खूप अडचणी येतात. विमानतळावर खूप वारा असल्यामुळे तिच्या साडीचा पदर सारखा सारखा खाली उडून पडतो. दुसरीकडे, जेव्हा उर्फीला तिची साडी सांभाळता येत नव्हती, तेव्हा तिच्यासोबत असलेल्या महिलेने तिला मदत केली.

उर्फीचा साडीतील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. तिला साडीमध्ये पाहून बऱ्याच चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तर साडीचा पदर सांभाळता येत नसल्याने अनेकांनी तिला ट्रोलही केले आहे.