अगंबाई.. उर्वशी रौतेला लग्नाअगोदरच साजरा करतेय रिषभ पंतच्या नावाचा करवा चौथ!

Pune – आज (१३ ऑक्टोबर) भारतभरात विवाहित स्त्रिया करवा चौथ व्रत साजरा करत आहेत. भारतातील वर्षभरात येणाऱ्या व्रतांपैकी करवा चौथ व्रत (Karwa Chauth) हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. करवा चौथ व्रत हे मुख्यत्वे करून सुवासिनी महिलांनी करावयाचे व्रत आहे. चांगला जोडीदार मिळावा, यासाठीही काही ठिकाणी कुमारिकाही हे व्रत करतात. अशात बॉलीवूडची ब्युटी क्वीन म्हणून ओळखली जाणारी उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हीदेखील करवा चौथ व्रतामुळे चर्चेत आली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी ही अविवाहित आहे. तरीही तिने सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यामुळे ती चर्चेचा विषय बनली आहे. यावरून चाहत्यांनी तिचे नाव भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याच्यासोबत जोडायला सुरुवात केली आहे.

मिस युनिवर्सचा खिताब मिळवणारी सुंदरी उर्वशी हिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो शेअर करत चक्क करवा चौथच्या शुभेच्या दिल्या आहेत. या फोटोंमध्ये उर्वशीने पांढऱ्या रंगाचा टॉप, लाला रंगाचा स्कर्ट आणि मॅचिंग रंगाचा हेअरबॅंड लावून कॅन्डिड पोजमध्ये फोटोशूट केले आहे. भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंतसोबत नाव जोडले गेलेली उर्वशी सध्या ऑस्ट्रेलियात असून तिने ऑस्ट्रेलियातून करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघही टी२० विश्वचषक २०२२साठी ऑस्ट्रेलियात आहे. याचमुळे चाहते तिला ट्रोल करत आहेत.

उर्वशीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत करवा चौथच्या शुभेच्छा देताना लिहिले की, “आशा करते की, चंद्राच्या प्रकाशासारखं तुमचं आयुष्यही आनंद, शांती आणि सद्भावनेनं भरुन जावं. इन अडवान्स करवा चौथच्या शुभेच्छा.” अशाप्रकारे लग्नाअगोदरच करवा चौथच्या शुभेच्छा देताना पाहून चाहते तिला ट्रोल करत आहेत. त्यासोबतच रिषभ पंतचेही नाव जोडत आहेत.

या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करत लिहिले आहे की, ‘उर्वशीने क्रिकेटर रिषभ पंतला करवा चौथचे आमंत्रण दिले आहे.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘दिदी फोटोबरोबर दर्दभरी शायरी लिहिली नाही का?,’ एवढेच नाही तर एकाने लिहिले की, ‘करवा चौथचा उपवासही धरणार का?’ असे प्रश्न विचारत उर्वशीला ट्रोल केले जात आहे.