I Love You म्हणण्यापूर्वी जाणून घ्या ‘लव्ह’ शब्द कुठून आला? इंग्रजी भाषेशी दूर दूरपर्यंत नाही संबंध

प्रेमी युगुलांचा सण म्हणजेच व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) सुरू झाला आहे. या संपूर्ण आठवड्यात जोडपी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या पार्टनरवरील प्रेम व्यक्त करतात. व्हॅलेंटाईन डेला (Valentine Day) जगभरातील लाखो लोक एकमेकांना आय लव्ह यू  (I Love You) म्हणतात आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोजल देतात. मात्र, प्रेमी युगुल सामान्य दिवसातही त्यांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांच्या जोडीदाराला आय लव्ह यू म्हणतात.

जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 👉🏻 https://chat.whatsapp.com/D3xA3iJHF0r1kodPsu0Q4H

पण आय लव्ह यू अर्थातच मी तुझ्यावर प्रेम करतो हे सांगण्यापूर्वी, लव्ह (LOVE) हा शब्द कुठून आला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? या इंग्रजी शब्दाचे मूळ दुसऱ्या भाषेतून घेतले आहे. आज आम्ही तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत.

लव्ह हा शब्द कुठून आला?
इंटरनॅशनल स्कूल ऑफ एज्युकेशनच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, लव्ह हा शब्द जुन्या इंग्रजी शब्द लुफूपासून बनला आहे. लुफू म्हणजे खोल आपुलकी. तथापि, हा लुफू शब्द मूळ इंग्रजी शब्द नाही. हा शब्द पर्शियन शब्द Luve, आणि जुन्या जर्मन शब्द Luba वरून आला आहे.

त्याचा वापर कधीपासून सुरू झाला
जर आपण अस्सल ऐतिहासिक कागदपत्रांवर नजर टाकली तर, 1423 च्या आसपास, लोक लव्हसिक हा शब्द एखाद्या व्यक्तीवर प्रेम दर्शवण्यासाठी वापरत असत. त्याच वेळी, 1919 च्या सुमारास लोक लव्ह लाईफ सारखे शब्द वापरू लागले.

कुणी पहिल्यांदा गुडघ्यांवर बसून प्रपोज केले
कुणी पहिल्यांदा गुडघ्यांवर बसत आपल्या प्रेयसीला प्रपोज केले, हे कुठेही ठोस लिहिलेले नाही. मात्र, पहिल्यांदा प्रपोज करताना जे चित्र जगासमोर आले ते 1925 साली आले, जेव्हा ‘सेव्हन चान्सेस’ या इंग्रजी चित्रपटाचा कॉमिक अभिनेता बस्टर कीटन त्याच्या नायिकेसमोर गुडघे टेकून आपले प्रेम व्यक्त करत होता.  तो एक मूकपट होता. असे म्हणतात की यानंतर आधी युरोपमध्ये, नंतर संपूर्ण जगात गुडघ्यावर बसून प्रपोज करण्याची परंपरा सुरू झाली.