Vanchit Bahujan Aghadi | वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर

Vanchit Bahujan Aghadi | महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. वंचितने ७ जागांचे उमेदवार जाहीर केले आहेत. रामटेक मधील उमेदवाराचा निर्णय आज संध्याकाळी ४ वाजेपर्यंत होईल.

राज्य कमिटीच्यावतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपुरातील उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) राज्य कमिटीने सांगलीतून प्रकाश शेंडगे (ओबीसी बहुजन पार्टी) यांना उमेदवारी दिल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या यादीतील उमेदवार
चंद्रपूर : राजेश बेले
बुलडाणा : वसंतराव मगर
अकोला : प्रकाश आंबेडकर
अमरावती : प्राजक्ता पिल्लेवान
वर्धा : प्रा. राजेंद्र साळूंके
यवतमाळ-वाशिम : खेमसिंग पवार
नागपूर : काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा
सांगली: प्रकाश शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पार्टीला पाठिंबा देणार

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार?

Murlidhar Mohol : …ही देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक : मुरलीधर मोहोळ

Ajit Pawar | आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार