Vasant More | वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट, पुणे लोकसभेच्या मैदानात उतरणार?

मनसेतून राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरे (Vasant More) पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी हालचाली करताना दिसत आहेत. वसंत मोरे यांनी महाविकास आघाडीतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीही घेतल्या होत्या. मात्र महाविकास आघाडीतून पुण्यात रविंद्र धंगेकर यांना संधी देण्यात आल्याने वसंत मोरेंची पंचाईत झाली. त्यानंतर आता वसंत मोरे (Vasant More) यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे.

शुक्रवारी वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत राजगृह इथं भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली याबाबत माहिती समोर आलेली नाही. मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करतील आणि वंचितच्या तिकिटावर ते पुण्यात लोकसभेच्या मैदानात उतरतील अशी चर्चा आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल