Eknath Shinde | प्रसिद्ध अभिनेता गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, १४ वर्षांनंतर राजकारणात करणार पुनरागमन

प्रसिद्ध अभिनेता गोविंदाने (Govinda) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. गोविंदाला लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळू शकते. मुंबई नॉर्थ वेस्ट मतदारसंघातून गोविंदाला तिकीट मिळू शकते. गोविंदाने यापूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचे पक्षात स्वागत करताना सांगितले की, गोविंदा अत्यंत साधा व्यक्ती आहे आणि सर्वांनाच तो आवडतो.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, “तळगाळाशी जोडलेल्या आणि सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या गोविंदाचे आज मी खऱ्या शिवसेनेत स्वागत करतो.गोविंदाच्या कोणत्याही अटी नाहीत. त्यांला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काम आवडले. त्याला आमच्यासोबत काम करायचे आहे. त्याला चित्रपटसृष्टीसाठी काहीतरी करायचे आहे. मला कोणाचेही तिकीट नको आहे, असे तो म्हणाला. वेगळी ओळख आहे. तो जिथे जातो तिथे हजारो लोक जमतात. आता तो आमच्यासोबत असेल तर लाखो लोक जमतील.”

तसेच पक्षप्रवेशानंतर गोविंदा म्हणाला, “जय महाराष्ट्र… मी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानतो. मी 2004-09 पासून राजकारणात होतो. त्यातून बाहेर पडल्यानंतर मी परत येईन असे वाटले नव्हते. पण 2010-24 हे 14 वर्ष संपले. 14 वर्षाचा वनवास. यानंतर मी पुन्हा शिंदेजींच्या रामराज्यात आलो आहे.”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

पुणे तिथे काय उणे? पुण्यासाठी मोहोळ, धंगेकर, मोरे आले एकत्र

Prakash Ambedkar | वंचितला अजून पाठींबा दिलेला नाही, मनोज जरांगेंनी फेटाळला प्रकाश आंबेडकरांचा दावा

Mumbai LokSabha | मुंबईतील सहापैकी चार लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे, कोणा कोणाला मिळालं तिकीट?