भाजपच्या मातब्बर नेत्याचा बेडरुममधील व्हिडिओ व्हायरल; राज्याच्या राजकारणात खळबळ

सोलापूर : सोशल मिडीयावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी कधी व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे कुणी प्रसिद्धीच्या झोतात येतो तर कधी कधी एखाद्याचे काळे धंदे सुद्धा समोर येत असतात. आज आम्ही ज्या व्हायरल व्हिडीओबाबत बोलत आहोत तो व्हिडीओ सोलापुरातील एका नेत्याचा आहे. भारतीय जनता पक्षाच्या (BJP) एका बड्या नेत्याचा बेडरूममधील व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

संबंधित नेत्याने आपली फसवणूक केल्याचे या व्हिडिओत ती महिला सांगत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे याच नेत्याने सात जुलै रोजी संबंधित महिलेच्या विरोधात मुंबईतील ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. आता त्या नेत्याचा थेट बेडरूममधील व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. (solapur BJP leader’s bedroom video’s viral)

या व्हिडिओत संबंधित महिला आणि तो नेताच दिसत आहे. हा नेता अंतर्वस्त्रावर बेडवर बसलेला आहे. संबंधित महिला मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर येऊन या नेत्याचे नाव घेत त्याने आपल्याला फसविल्याचे सांगत असल्याचे दिसत आहे. हे वाक्य ऐकताच तो नेता बेडवरून उठला आणि त्याने मोबाईलचे चित्रीकरण बंद केल्याचे दिसून येत आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी संबंधित नेत्याने त्या महिलेवर हनीट्रॅपचा आरोप करत ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यांची सोलापूर जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. दरम्यान, आता नेत्याचा थेट बेडरुममधील व्हिडिओ व्हायरल झाल्याने उलटसुलट चर्चा देखील सुरु झाली आहे.