विक्रम गोखले यांची प्रकृती अतिशय चिंताजनक, नवीन हेल्थ अपडेट आले समोर

पुणे : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. विक्रम गोखले यांची तब्येत खालावली असून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते गेल्या १५ दिवसांपासून या रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळत आहे.

८२ वर्षीय विक्रम गोखले यांची तब्येत सध्या नाजूक (Vikram Gokhale Health Update) असल्याने कुटुंबीय आणि चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार उपचांराना प्रतिसाद देत नसल्यानंविक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं त्यांची प्रकृती अद्याही चिंताजनक असल्याचं म्हटलं जात आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृतानुसार, गेल्या १५ दिवसांपासून विक्रम गोखले यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. आज सकाळपासून त्यांची प्रकृती बिघडली आहे आणि त्यांनी डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद देणं थांबवल्याची माहिती आहे. त्यांची प्रकृती आता अतिशय चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान त्यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप याविषयी कोणतेही निवेदन किंवा माहिती समोर आलेली नाही.