Viral video | पेट क्लिनिकमधील कर्मचाऱ्यांकडून पाळीव कुत्र्याला जोरदार मारहाण, व्हायरल व्हिडिओने खळबळ उडाली

महाराष्ट्रातून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral video ) झाला आहे, ज्याने श्वानप्रेमींचे रक्त उकळले आहे. व्हिडिओमध्ये दोन कर्मचारी ग्रूमिंग सेशनच्या बहाण्याने पाळीव कुत्र्याला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. यावेळी कुत्रा असहाय्यपणे मारहाण सहन करत असतो. अवघ्या काही सेकंदांची ही व्हिडिओ क्लिप (Viral video ) पाहिल्यानंतर इंटरनेट युजर्स चांगलेच संतापले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला लागून असलेल्या ठाण्यातील आर मॉलजवळ असलेल्या वेटिक पेट क्लिनिकमध्ये ही अत्यंत संतापजनक घटना घडली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पशुवैद्यकीय कर्मचारी पाळीव कुत्र्याला बुक्कीने कसे मारत आहेत. एवढंच नाही तर कॅमेऱ्याकडे पाहिल्यानंतर तो व्यक्ती हसत हसत कुत्र्याच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर ठोसा मारत राहतो. कर्मचाऱ्यांच्या मारहाणीपासून वाचण्यासाठी कुत्रा कॉटवरून उडी मारून थेट दरवाजाच्या दिशेने पळत असल्याचे व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत आहे. याआधी कॅमेरा मागे उभी असलेली दुसरी व्यक्तीही कुत्र्याला लाथ मारण्याचा प्रयत्न करते.

क्लिनिकने काय स्पष्टीकरण दिले?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. वेटिकच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘हे अत्यंत धक्कादायक आणि आम्हाला पूर्णपणे अस्वीकार्य आहे. दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.’

महत्वाच्या बातम्या

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष शेलार…; भाजप प्रवेशानंतर बोलताना अशोक चव्हाणांकडून चूक, फडणवीसही हसून बेजार

छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन समाजाचे राजे, Chhagan Bhujbal यांचे मोठे वक्तव्य

Rajya Sabha Elections | राज्यसभेसाठी शरद पवार मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत, छत्रपती शाहू महाराजांना देणार उमेदवारी!