viral video | कर्माचे फळ..! चालत्या ट्रेनमध्ये गळ्यातला हार हिसकावण्याचा प्रयत्न, पुढे काय घडलं?

चालत्या ट्रेनमधून एक अतिशय धक्कादायक व्हिडिओ व्हायरल ( viral video) झाला आहे, ज्याला पाहून लोक हैराण झाले आहेत आणि त्याला ‘कर्माचे फळ’ असेही म्हणत आहेत. झालं असं की, ट्रेनच्या दारात उभ्या असलेल्या एका तरुणाने टॉयलेटमधून येणाऱ्या वृद्ध महिलेची चैन ओढण्याचा प्रयत्न केला. पण पुढच्याच क्षणी त्या तरुणाचे जे काही झाले ते हृदय पिळवटून टाकणारे आहे. ही संपूर्ण घटना ट्रेनमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचे फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये (viral video) एक तरुण रेल्वेच्या दरवाजाजवळ उभा असल्याचे पाहायला मिळत आहे. तो इकडे तिकडे पाहत राहतो. ट्रेन खूप वेगाने धावत आहे. दरम्यान, दोन वृद्ध महिला शौचालयाच्या दिशेने येताना दिसत आहेत. त्यांना काही समजण्यापूर्वीच तरुणाने विजेच्या वेगाने महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणाला त्याच्या कृत्याची तात्काळ शिक्षा मिळते. साखळी ओढण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा तोल गेला आणि तो चालत्या ट्रेनमधून थेट रेल्वे रुळावर पडला.

लोक म्हणाले ‘कर्माचे फळ’
एका यूजरने लिहिले आहे की, याला कर्मांचे फळ म्हणतात. त्याचवेळी आणखी एका युजरने कमेंट केली आहे की, चोर इतके बेधडक झाले आहेत की त्यांनी आता चालत्या ट्रेनमध्येही चेन हिसकावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दुसरा वापरकर्ता म्हणतो, आता तो तुटलेल्या पायांसह हॉस्पिटलमध्ये पडला असावा.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

पुणे तिथे काय उणे? पुण्यासाठी मोहोळ, धंगेकर, मोरे आले एकत्र

Prakash Ambedkar | वंचितला अजून पाठींबा दिलेला नाही, मनोज जरांगेंनी फेटाळला प्रकाश आंबेडकरांचा दावा

Mumbai LokSabha | मुंबईतील सहापैकी चार लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे, कोणा कोणाला मिळालं तिकीट?