Kangana Ranaut | सुभाषचंद्र बोस यांना देशाचे पंतप्रधान का बनवण्यात आले नाही? कंगना रणौतचा सवाल

Kangana Ranaut | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने अभिनेत्री कंगना रणौत हिला हिमाचल प्रदेशातील मंडी येथून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कंगना चर्चेत आली आहे. काँग्रेस नेत्यांनी कंगना राणौतविरोधात जोरदार वक्तव्य केलं होतं. यावर कंगनाने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने पंतप्रधान मोदींना सूर्य आणि विरोधकांना मेणबत्ती म्हटले आहे.

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेथ यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर कंगना रनौत आणि मंडी यांच्यावर आक्षेपार्ह कमेंट पोस्ट करून मोठा राजकीय वाद निर्माण केला आहे. अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) हिच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने बुधवारी काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाथ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

एका मुलाखतीत कंगना रणौतने आझाद हिंद फौजेचे संस्थापक आणि महान स्वातंत्र्यसेनानी सुभाष चंद्र बोस यांचे देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून वर्णन केले. कंगना म्हणाली, “ज्या व्यक्तीने आपले रक्त सांडून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. जर्मनीपासून जपानपर्यंतच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्याला या देशाचा पंतप्रधान का बनवण्यात आले नाही? अखेर ते कुठे गायब झाले?”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

पुणे तिथे काय उणे? पुण्यासाठी मोहोळ, धंगेकर, मोरे आले एकत्र

Prakash Ambedkar | वंचितला अजून पाठींबा दिलेला नाही, मनोज जरांगेंनी फेटाळला प्रकाश आंबेडकरांचा दावा

Mumbai LokSabha | मुंबईतील सहापैकी चार लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे, कोणा कोणाला मिळालं तिकीट?