Virat Kohli | माझं एकच स्वप्न! ‘या’ सुंदर अभिनेत्रीने विराटकडे केली भलतीच मागणी; पूर्ण करू शकणार का?

Varsha Bollamma On Virat Kohli : तमिळ आणि तेलुगू चित्रपटांची सुपरस्टार वर्षा बोलम्माला क्रिकेटची खूप आवड आहे. विशेषत: ती अनेकदा आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यांमध्ये दिसते. मात्र, आयपीएल 2024 चा हंगाम सुरू होण्यापूर्वी वर्षा बोलम्माने विराट कोहलीला खास मागणी केली आहे. वर्षा बोल्लाम्मा तिच्या नुकत्याच झालेल्या मुलाखतीत सांगत आहे की, माझे एकच स्वप्न आहे की विराट कोहलीने (Virat Kohli) एकदा तरी आयपीएल ट्रॉफी हातात घ्यावी. हे होईल आणि यावेळीच होईल.

‘माझे एकच स्वप्न आहे की विराट कोहलीचे तरी…’
या मुलाखतीत वर्षा बोलम्मा पुढे म्हणते की, मी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी क्रिकेट पाहण्यास सुरुवात केली. मला एकदा तरी विराट कोहलीच्या हातात आयपीएल ट्रॉफी पाहायची आहे. वर्षा बोलम्मा हिचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया युजर्स वर्षा बोलम्मा आणि विराट कोहली यांच्यावर सतत कमेंट करून त्यांची प्रतिक्रिया देत आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पहिल्यांदाच जिंकणार आयपीएलचे विजेतेपद!
आयपीएलची सुरुवात जवळपास 16 वर्षांपूर्वी 2008 मध्ये झाली होती. मात्र आजपर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला विजेतेपद मिळवण्यात अपयश आले आहे. मात्र, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ 2009, 2011 आणि 2016 मध्ये तीनदा फायनलमध्ये पोहोचला होता, पण चॅम्पियन बनू शकला नाही. विराट कोहली पहिल्या सत्रापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत आहे. मात्र, आयपीएल 2024 च्या मोसमात हा संघ चांगली कामगिरी करू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फाफ डू प्लेसिसच्या हाती आहे. याआधी विराट कोहलीने दीर्घकाळ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद भूषवले होते.

महत्वाच्या बातम्या : 

विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी: Nana Patole

Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले

Muralidhar Mohol | मोहोळांनीही उघडले लोकसभेचे पत्ते; म्हणाले, ‘मी लोकसभेची तयारी करतोय, पण…’